बाळासाहेब ही म्हणाले असतील शाब्बास संजय!; केदार दिघे यांचं ट्विट चर्चेत

323 0

मुंबई: शिवसेना नेते राज्यसभा खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी ईडीकडून ताब्यात घेण्यात आलं असून संजय राऊत यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे.

दरम्यान संजय राऊत यांना ताब्यात घेतल्यानंतर अनेकांनी आपली प्रतिक्रिया दिली असून धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली असून बाळासाहेब ही म्हणाले असतील..शाब्बास संजय!

ना डर,ना सत्तेचा लोभ,ना मला वाचवाची भीक मागितली…तो योध्दा निडर पणे चालला शिवसेनेचा आणि महाराष्ट्राचा मराठीबाणा जोपासण्यासाठी…! दिल्ली समोर झुकणार नाही!

जे घाबरून पळाले ते शिवसैनिक असू शकत नाहीत? अशी प्रतिक्रीया ट्विटरच्या माध्यमातून केदार दिघे यांनी दिली आहे.

Share This News
error: Content is protected !!