आता पुढची मुलाखत जेलमध्ये जेलरसोबत; निलेश राणेंचा प्रहार

392 0

मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांची सकाळी ७ वाजेपासून ईडी अधिकारी चौकशी करत आहेत. तपास यंत्रणेचे पथक संजय राऊत यांच्या भांडुप, मुंबईतील घरी सकाळी पोहोचले आहे. त्यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात नेले जाऊ शकते.

याच पार्श्वभूमीवर भाजप नेते निलेश राणे यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांची पुढची मुलाखत जेलमध्ये जेलर सोबत असेल अशी टीका त्यांनी केली आहे.

निलेश राणे यांनी ट्विट करत म्हंटल की, ईडीच्या चौकशीला सहकार्यच करायचं नाही असं संजय राऊतांनी ठरवलं होत त्यामुळे ईडी ला त्यांच्या घरी जावं लागलं . १२०० कोटींचा एवढा मोठा घोटाळा झाल्यामुळे संजय राऊतांना ईडीच्या प्रश्नांना उत्तरे द्यावीच लागणार आहेत. ब्रिटिशांनी काय देश सोडताना याच्या नावाने प्रमाणपत्र दिले आहे का कि याच्यावर कारवाई होता काम नये . याने असले चाळे केले तरी चालतील, महिलांना शिव्या घातल्या तरी चालेल तरी याला काय करू नका असं प्रमाणपत्र राऊतांकडे आहे का ?? असा खोचला सवाल त्यांनी केला

Share This News
error: Content is protected !!