राज्यसभा खासदार उदयनराजे यांनी घेतली नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट

322 0

नवी दिल्ली: भाजपाचे राज्यसभा खासदार उदयनराजे यांनी भारताच्या नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू  यांची भेट घेत. राष्ट्रपतीपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत 

या भेटीदरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून महिलांच्या शिक्षणाला प्राधान्य देवून महिलांचा सन्मान करणारे छत्रपती प्रतापसिंह महाराज यांच्या ऐतिहासिक सातारानगरीला मी आवश्य भेट देईन. असे आश्वासन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिले असल्याचं उदयनराजे यांनी सांगितलं

भाजप प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मूजी यांची राष्‍ट्रपतीपदी प्रचंड मताधिक्यांनी निवड झाली असून सर्वोच्च पदावर विराजमान होणाऱ्या त्या पहिल्या आदिवासी महिला आणि भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत.

Share This News
error: Content is protected !!