संजय राऊतांची अवस्था स्क्रिझोफ्रेनिया झालेल्या रूग्णासारखी; विजय शिवतारे यांची टीका

293 0

मुंबई: शिवसेना नेते माजी मंत्री विजय शिवतारे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली असून शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना मधून ही माहिती देण्यात आली. 

दरम्यान या हकालपट्टीनंतर विजय शिवतारे यांनी हकालपट्टी करण्यात आल्यानंतर त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी जे बंड पुकारलं त्याला संजय राऊत जबाबदार आहेत. तसंच सध्याची त्यांची अवस्था स्क्रिझोफ्रेनिया झालेल्या रूग्णासारखी आहे असंही विजय शिवतारे यांनी म्हटलं आहे.

मेडिकल टर्ममध्ये सिझोफ्रेनिया आजार आहे. या आजाराच्या माणसाला काहीच प्रॉब्लेम नसतो. हुशार माणसाला हा आजार होतो. ही माणसं अतिविचाराच्या गर्तेत जातात. त्यातून त्यांना वेगवेगळे भास होतात. गोव्यात आमच्याशिवाय सरकार बनणार नाही हा भास राऊतांना झाला. आदित्य ठाकरेंना घेऊन गेले आणि तिथे तमाशा झाला. नोटापेक्षाही कमी मते शिवसेनेच्या उमेदवारांना मिळाली. हिंदुत्वाच्या मुद्दयावर योगी सरकारला आव्हान देण्यासाठी गेले त्याठिकाणी १३९ उमेदवार उभे केले. सर्वांचे डिपॉझिट जप्त झाले. दिल्ली काबीज करू आणि उद्धव ठाकरेंना पंतप्रधान करू म्हणतात हा तिसरा भास आहे. चुकीच्या प्रकारे विधाने करून ते बिंबवतात. त्यामुळे राऊतांना हा आजार जडलाय का? असा प्रश्न उभा राहतो असा खोचक टोला शिवतारेंनी लगावला.

 

Share This News
error: Content is protected !!