एनआयआरएफ रँकिंग; पुणे विद्यापीठ देशात बाराव्या स्थानी

255 0

राष्ट्रीय पातळीवर देशभरातील शैक्षणिक संस्थांचे मूल्यांकन करणाऱ्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क’ २०२२ ची क्रमवारी जाहीर झाली असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे विद्यापीठांच्या क्रमवारीत बाराव्या स्थानावर आहे.

केंद्र सरकारच्या मनुष्यबळ व विकास मंत्रालयाच्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क’ कडून दरवर्षी शैक्षणिक संस्थांची क्रमवारी जाहीर केली जाते. विविध विद्याशाखांचे शिक्षण देणाऱ्या उच्च शिक्षण संस्थांचे विविध निकषांच्या आधारे मूल्यांकन केले जाते.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे गेली काही वर्षे सातत्याने वरच्या क्रमांकावर असून राज्यातून देशपातळीवर आघाडीवर असणारे राज्यातील पाहिले सार्वजनिक विद्यापीठ आहे. या क्रमवारीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे एकूण गुण ५९.४८ असून मागील वर्षी ही गुणाची आकडेवारी ५८.३४ होती.

एनआयआरएफ रँकिंगमध्ये विद्यापीठाच्या कामगिरीची गेल्या वर्षाशी तुलना केली, तर 2021 मध्ये 100 विद्यापीठांच्या यादीत पुणे विद्यापीठ 11 व्या स्थानावर होते. यंदा 12 वे स्थान विद्यापीठाला मिळाले आहे. विद्यापीठांच्या यादीत जरी केवळ एकाच स्थानाची घसरण झाली असली, तरी देशस्तरावरील सर्व संस्थांची गेल्या वर्षीची तुलना केली तर गेल्या वर्षी विद्यापीठ 20 व्या स्थानावर होते. यंदा त्यात मोठी घसरण होऊन विद्यापीठ थेट 25 व्या स्थानावर घसरले आहे. या क्रमवारीत विद्यापीठाचे एकूण गुण 59.48 असून, मागील वर्षी ही गुणाची आकडेवारी 58.34 होती. त्यामुळे गुणांमध्ये किंचित वाढ असली, तरी क्रमांकात मात्र घसरण झाल्याचे दिसून आले आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!