उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज घेणार राज ठाकरेंची भेट

267 0

मुंबई: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मनसे प्रमुख राज ठाकरेंची भेट घेणार आहे. ही भेट दोन दिवसांपूर्वी होणार होती मात्र पाऊस असल्याने हो भेट दोन दिवस पुढे ढकलण्यात आली होती. शिवतीर्थ निवासस्थानी भेट होणार असून राजकीय चर्चा होण्याची शक्यता आहे.

नवीन सत्ता स्थापन झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा राज ठाकरेंना भेटणार आहे. त्यामुळे ही भेट महत्त्वाची ठरणार आहे. राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं होतं. शिंदे गटाची आणि भाजपची सत्ता स्थापन झाल्यावर भेटू असं पत्रात नमूद केले होते.

येत्या महानगर पालिका निवणुकीसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. शिवतीर्थावर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!