सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मतदार नावनोंदणीसाठी २४ जुलैपर्यंत मुदतवाढ

353 0

पुणे: सार्वजनिक विद्यापीठ कायद्यांतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात २०२२ या वर्षात होणाऱ्या विविध अधिकार मंडळाच्या निवडणुकीसाठी मतदार यादीत नाव नोंदणीसाठी विद्यापीठ अधिकार मंडळाने मुदतवाढ दिली आहे.

याआधी प्राचार्य, शिक्षक व विभागप्रमुख यांना १३ जुलैपर्यंत मुदत होती ती वाढवून २३ जुलै करण्यात आली आहे. तर पदवीधरांना व संस्था प्रतिनिधींनीना १४ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती ती वाढवून आता २४ जुलै करण्यात आली आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणाची निवडणूक प्रक्रिया जून २०२२ पासून सुरू झाली आहे. या प्राधिकरणाची मुदत पुढील पाच वर्षांसाठी असणार आहे. मतदारांच्या नोंदणीसाठी विद्यापीठाने http://election.unipune.ac.in हे वेब पोर्टल तयार केले आहे. या माध्यमातून पदवीधर घरबसल्या आपली नोंदणी करू शकतात. जुन्या मतदारांनाही पुन्हा नोंदणी करणे आवश्यक असते. ज्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही त्यांनी लवकरात लवकर नोंदणी करावी यासाठी पुन्हा मुदतवाढ दिली जाणार नाही असे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

नावनोंदणीसाठी लिंक 
https://election.unipune.ac.in/EleApp/Registration/Rg_Registration2017.aspx

—-

Share This News
error: Content is protected !!