राज्य सरकार यापुढे असेच लोकहिताचे निर्णय घेत राहील; मनसेच्या एकमेव आमदाराने मानले राज्य सरकारचे आभार

311 0

मुंबई: आज झालेल्या बैठकीत पेट्रोल 5 रुपयांनी तर डिझेल 3 रुपयांनी स्वस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्त पत्रकार परिषद देऊन दिली आहे.

या निर्णयानंतर मनसेचे आमदार राजू पाटील यांनी ट्विटरच्या माध्यमातून राज्य सरकारचे आभार मानले असून आज मध्यरात्रीपासून पेट्रोल ५ रूपयांनी व डिझेल ३ रूपयांनी स्वस्त होणार. यापुढेही असेच लोकहिताचे निर्णय हे सरकार घेईल या अपेक्षेसह शिंदे-फडणवीस सरकारचे मनसे आभार ! असं ट्विट राजू पाटील यांनी केलं आहे.