भारत हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. विविध परंपररा असणारा असणाऱ्या या देशात विविध सण वेगवेगळ्या पद्धतीनं साजरे केले जातात.महाराष्ट्रात शेती हा व्यवसाय प्रामुख्याने केला जातो. शेतीसंबंधी अनेक उत्सवही साजरे केले जातात.पोळा हा सण प्रामुख्याने शेतकऱ्यांचा सण म्हणून ओळखला जातो. पोळ्याप्रमाणेच बेंदूर हा सण प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रात साजरा केला जातो.
बेंदूर सण आषाढ पौर्णिमेला साजरा केला जातो,तर इतर काही राज्यांत हा सण जेष्ठ पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो महाराष्ट्रात हा सण महाराष्ट्रीय बेंदूर म्हणून साजरा केला जातो. या दिवशी शेतकरी आपल्या सर्जा राजाची विशेष काळजी घेतात.पूर्वी पेरणीपासून तर संबंधीच्या सगळ्या गोष्टी बैलांवर अवलंबून होत्या. विहिरीतील पाणी काढणे असो किंवा शेतात ये – जा करणे असो बैलगाडीचा वापर प्रामुख्यानं होत असे. आता शेतीसाठी आधुनिक यंत्राचा वापर केला जात तरीही बरेच लोकं हे शेतीसाठी बैलांचा उपयोग करतात. त्यामुळं ते बैलांना देव मानतात. बैल पोळा, पोळा किंवा बेंदूर या सण प्रत्येक शेतकरी बांधव मोठ्या उत्साहात साजरे करतात.
अशा पद्धतीनं साजरा केला जातो बेंदूर सण
बेंदूर सण व पोळा या दोन सणांमध्ये खुप साम्य आहे.फक्त पोळा हा सण श्रावण अमावास्येला साजरा करतात बेंदूर सण आषाढ पौर्णिमेला साजरा केला जातो.या दिवशी बैलांना गरम पाण्याने धुतलं जाते.त्यांचे खांदे गरम पाण्याने शेकून त्यावर हळदीचा लेप लावला जातो त्याला खांदेमळणी असे म्हणतात.या दिवशी बैलांना पुरणपोळी खाऊ घालतात. चिखलाचे बैल बनवून त्यांची पूजा केली जाते. त्यांच्या शिंगावर हरभरा डाळ व गुळापासून बनवलेली कडबोळे ठेवतात.या दिवशी बैलांच्या मानेवर दिले जाणारे ‘जू’ ची पूजा करतात व त्यालाही पुरणपोळी चा नेवेद्य दाखवतात. बैलांना झूल घालून त्यांची शिंगे रंगवतात .ढोल ताशे लावून त्याची मिरवणूक काढली जाते.अशा पद्धतीनं बेंदूर हा सण साजरा केला जातो.