एकनाथ शिंदे यांच्या धावत्या पुणे भेटीत युवा सेनेला धक्का, पदाधिकाऱ्यांनी केला शिंदे गटात प्रवेश

544 0

पुणे : शिवसेनेचे आमदारांनी बंड केल्यानंतर या बंडाला पुण्यातून फारसा पाठिंबा मिळालेला नव्हता.
ठाकरे यांच्याकडून पुण्याला सावत्र वागणूक दिल्याने आम्ही शिंदे यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. हा बंड नाही तर उठाव आहे, अशी भूमिका या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
खासदार गिरीश बापट यांच्यासह माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, अजय भोसले, किरण साळी यांनी एकनाथ शिंदे यांचे स्वागत केले.

आषाढी एकादशीनिमित्त शासकीय पूजेसाठी एकनाथ शिंदे लोहगाव विमानतळावरून पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले. त्यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला अजय भोसले हे पुणे महापालिकेचे माजी नगरसेवक आहेत, त्यांनी शिवसेनेकडून वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. तसेच त्यांचे मातोश्रीवर देखील निकटचे संबंध होते. तर किरण साळी हे युवासेनेच्या माध्यमातून विद्यार्थी चळवळीत काम करत आहेत. आदित्य ठाकरे, वरूण सरदेसाई यांचे ते निकटवर्तीय मानले जात होते.

या दोन्ही पदाधिकाऱ्यांसह युवासेनेचे विद्यापीठ कक्षाचे उपाध्यक्ष आकाश शिंदे यांनी आज पदाचा राजीनामा देत एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला.

Share This News
error: Content is protected !!