पाटस टोल नाक्यावर वारकऱ्यांकडून टोल वसूली; 4 जणांवर गुन्हा दाखल

310 0

पाटस येथील टोल नाक्यावर वारकऱ्यांकडून नियमबाह्य टोल वसूल करून महाराष्ट्र शासनाच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी मॅनेजरसह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबतची माहिती यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली.पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहन चालकांकडून टोल वसूल करू नये असं दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र शासनाच्या वतीने जाहीर केले होते. दरम्यान वारकऱ्यांच्या वाहनांकडून टोल वसूल करू नका असं यवतचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी देखील लेखी स्वरुपात पाटस टोलनाका प्रशासनाला शासनाच्या परिपत्रकानुसार कळवले होते. याप्रकरणी पाटस टोलनाक्याचे अधिकारी अजयसिंग ठाकूर, सुनील थोरात, विकास दिवेकर, बालाजी वाघमोडे या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share This News
error: Content is protected !!