Breaking News

एलॉन मस्क यांचा ‘ट्विटर’ विकत घेण्याचा करार रद्द; आता कोर्टबाजी रंगणार

368 0

 

जगात सर्वांत श्रीमंत माणुस म्हणुन ओळखला जाणारा , टेस्लाचे मालक एलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेण्याचा करार रद्द केला आहे. याबाबत माहिती देताना त्यांनी शुक्रवारी आपण ट्विटर विकत घेत नसल्याचं सांगितलं आहे.

एलॉन मस्क यांनी 44 अब्ज डॉलरमध्ये’ट्विटर’ विकत घेत असल्याची माहिती एका ट्विटद्वारे दिली होती.त्यामुळं ट्विटर आता खासगी कंपनी होत असल्याचं दृश्य निर्माण झालं होतं, पण त्यांनी ‘बनावट खात्यांचा तपशील देण्यात ट्विटर कंपनीला यश आले नाही व त्यामुळं ही कंपनी विकत घेण्याचा करार रद्द करत असल्याचं जाहीर केलं आहे. त्यांच्या या निर्णयामुळं ट्विटर कंपनीचा 44 अब्ज डॉलरचा करार संपुष्टात आला असून ट्विटरची पातळी घसरली आहे.

ट्विटरचे महत्व सांगताना मस्क म्हणाले होते की, ‘मी या कंपनीला एका वेगळ्या दिशेनं नेणार आहे. या कंपनीला अजुन यशस्वी करण्यासाठी मी प्रयत्न करेल. ट्विटर हे डिजिटल टाऊन स्क्वेअर असुन, यामध्ये मानवाच्या सर्व मुद्द्यांवर चर्चा केली जाते.

एलॉन मस्क यांच्यासमोर ट्विटर कंपनीने जे प्रेझेंटेशन दिलं ते दिशाभूल करणारं होतं त्यामुळे मस्क यांनी त्यांच्याकडून हा करार रद्द केला आहे असं त्यांच्या प्रवक्त्यांनी सांगितलं आहे. यासंदर्भात ट्विटरचे चेअरमन Bret Taylor यांनीही एक ट्विट केलं आहे. ट्विटर बोर्डासोबत एलॉन मस्क यांनी करार केला होता. आता तो पूर्ण करण्यासाठी ते कायदेशीररित्या बांधील आहेत. आम्ही करार पूर्ण व्हावा म्हणून कायदेशीर कारवाई करणार आहोत. कोर्ट आम्हाला न्याय देईल यावर आमचा पूर्ण विश्वास आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.

Share This News
error: Content is protected !!