आपला महाराष्ट्रठळक बातम्याब्रेकिंग न्यूजराजकारणराष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

नवी दिल्ली: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दिल्ली दौऱ्यावर असून या दौऱ्यादरम्यान संरक्षणमंत्री राजनाथ सिंह गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची शिंदे आणि फडणवीस यांनी भेट घेतली.

अमित शहा यांच्या भेटीमध्ये मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यामध्ये राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात सुमारे 4 तास खलबतं झाली असल्याची माहिती असून नुकतीच शिंदे आणि फडणवीस यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची देखील भेट घेतली आहे.

दुपारी 1 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद होण्याची शक्यता असून या पत्रकार परिषदेनंतर शिंदे आणि फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत.