Breaking News

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह आळंदीत; ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधीचं घेतलं दर्शन…

311 0

 

पुणे: काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी आज आळंदी येथे जाऊन संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधीचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी पंढरपूरचा विठुराया तसेच ज्ञानेश्वर माऊलींना देशात चांगला पाऊस पडू दे, चांगलं पीक येऊ दे, अशी प्रार्थना केली.

ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधीचं दर्शन घेतल्यानंतर दिग्विजय सिंह यांनी केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारवर सडकून टीका केली. भारतीय जनता पक्षानं घोडेबाजार करून तसेच इडी, आयटीचा दुरुपयोग करून राज्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या साह्यानं महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली, असा आरोपही दिग्विजय सिंह यांनी केला. भारतीय जनता पक्षामुळं देशातील लोकशाही धोक्यात आली आहे. ईव्हीएम मशीन आणि पैशाचा दुरुपयोग करून भाजप देशात सत्ता काबीज करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

Share This News
error: Content is protected !!