मोठी बातमी! जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचं निधन

211 0

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर नारा शहरात हल्ला झाल्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर बनली होती. दरम्यान, उपचारादरम्यान त्यांचे निधन झालं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोळी लागल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. गोळी लागल्याने त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि रुग्णालयात नेले तेव्हा ते कोमात होते, असे सांगण्यात येत आहे.

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अत्यंत जवळचे मित्र आहेत. भारत आणि जपान यांच्यातील संबंध वृद्धिंगत करण्यात शिंजो आबे यांचा मोलाचा वाटा आहे. २०१७ मध्ये ते भारतात आले होते. त्यावेळी पंतप्रधान मोदींनी अहमदाबाद विमानतळावर त्यांचे स्वागत केले होते. तसेच २०१८ मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जपान दौऱ्यावर गेले होते. तेव्हा शिंजो आबे यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदी हे माझे जवळचे आणि अत्यंत विश्वासू मित्र असल्याचे सांगितले होते.

Share This News
error: Content is protected !!