आता शिरूर नाही तर ‘या’ मतदारसंघातून लढा; शिवसेनेची आढळराव पाटील यांना ऑफर

461 0

पुणे: शिवसेनेच्या बहुसंख्य आमदारांनी शिवसेनेच्याच विरोधात बंड करत स्वतंत्र गट स्थापन करुन सरकार स्थापन केले आहे. दरम्यान, पक्षाचे आजी-माजी खासदारही शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. यातच, पक्षाने अडीच वर्षानंतर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केल्याचे दिसत आहे.

यातच आता शिवसेनेनं शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढाळराव-पाटील यांना पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे आवाहन केले आहे.

यातून संभाव्य महाविकास आघाडीच्या जागावाटपात पुणे लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेकडे जाणार असल्याचे शिवसेनेने या निमित्ताने सांगितले आहे. तसेच आढळरावांना रस असलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाची जागाही राष्ट्रवादीकडेच राहणार असल्याचेही या `ऑफर`मधून दिसून येत आहे.

मंगळवारी मुंबई येथे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची शिवाजीराव आढळराव पाटील यांनी `मातोश्री` निवास्थानी भेट घेतली. अरविंद सावंत, शिवसेनेचे सचिव अनिल देसाई, माजी मंत्री सुभाष देसाई, दिवाकर रावते, आदेश बांदेकर, जुन्नरचे माजी आमदार जिल्हा प्रमुख शरद सोनावणे उपस्थित होते.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!