अक्षयकुमारच्या रक्षाबंधन चित्रपटातील ‘कंगन रुबी’ गाण्याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद

391 0

बॉलीवूड सुपरस्टार अक्षय कुमारच्या अक्षय कुमारने सध्या ‘रक्षा बंधन’ या चित्रपटामध्ये काम केलं आहे. त्याच्या या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट बघत आहे. रक्षा बंधन या चितपटातील ‘कंगन रुबी’ हे गाणं रिलीज झालं असून त्याला सोशल मीडियावर भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

या गाण्यामध्ये अक्षय कुमारसोबत अभिनेत्री भूमी पेंडनेकर  बघायला मिळत आहे. या पुर्वी अक्षय कुमार आणि भूमी पेंडेकर यांनी  ‘टॉयलेट – एक प्रेमकथा’ या चित्रपटामध्ये काम केलं होते आणि त्यांच्या या जोडीला चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता. आता त्यांच्या कंगन रुबी या गाण्याला सुद्धा खूप प्रतिसाद मिळत आहे.

 

‘रक्षा बंधन’ या चित्रपटामध्ये अक्षय कुमार सोबत भूमी पेंडनेकर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.आनंद एल राय दिग्दर्शित रक्षा बंधनया  चित्रपटामध्ये दिपिका खन्ना, स्मृती श्रीकांत हे देखील दिसणार आहेत. यापूर्वी आनंद एल राय यांनी अतरंगी रे, तनु वेड्स मनु ,झिरो तसेच रांझना अशा बऱ्याच सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शन केलं आहे.आता त्यांच्या ‘रक्षाबंधन’ या चित्रपटाला सुद्दा चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळणार आहे असे दिसते आहे.

Share This News
error: Content is protected !!