अडीच वर्षांत मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते आणि उपमुख्यमंत्री होणारे देवेंद्र फडणवीस एकमेव नेते – अजित पवार

257 0

मुंबई: राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर आजचा दिवस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा होता. बहुमत सिद्ध करण्यासाठी दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं होतं. 

या अधिवेशनात 164 आमदारांचे बहुमत मिळवत शिंदे सरकारनं हा विश्वासदर्शक ठराव जिंकला त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला संबोधित केलं त्यानंतर सभागृहात अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस हे नशीबवान नेते असून अडीच वर्षांत मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते आणि उपमुख्यमंत्री होणारे देवेंद्र फडणवीस एकमेव नेते आहेत असं म्हणत पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.

त्याचबरोबर एकनाथ यांच्यामध्ये पात्रता होती तर देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांना केवळ सार्वजनिक बांधकाम खातं का दिलं ? असा सवाल देखील पवार यांनी यावेळी उपस्थित केला.

Share This News
error: Content is protected !!