महाविकास आघाडी 100 च्या आत; मिळाली 99 मतं

325 0

विधानसभा अधिवेशनाचं दोन दिवसीय विशेष अधिवेशन सुर आहे. या अधिवेशनाचा आज दुसरा आणि अखेरचा दिवस आहे. शिवसेनेत बंड करत भाजपसोबत सत्ता स्थापन केलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा होता.

सरकारने पार केला बहुमताचा टप्पा

आत्तापर्यंत बहुमतापेक्षा जास्त मतं शिंदे सरकारच्या बाजूने मिळालेली आहेत. त्यामुळे शिंदे सरकारला दिलासा मिळाला आहे.

शिरगणती सुरू झाल्यानंतर विजय वडेट्टीवार आणि अशोक चव्हाण विधानभवनात दाखल झाले आहेत. त्यामुळे आता ते मतदान करता आले नाही.

मात्र एकीकडे शिंदे सरकारला दिलासा मिळाला असला तरी महाविकास आघाडीला मात्र मोठा धक्का बसला असून महाविकास आघाडीला केवळ 99 मतं मिळाली आहेत.

Share This News
error: Content is protected !!