शिवाजी आढळराव पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी

661 0

पुणे: राज्यात सुरू असलेल्या अनेक नाट्यमय राजकीय घडामोडींनंतर अखेर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली या राजकीय नाट्यावर पडदा टाकला खरा मात्र या बंडखोर आमदारांवर कारवाई करण्यास शिवसेनेने सुरुवात केल्यानंतर आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे.

शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्यावर पक्षां विरोधात कारवाई केल्याचा ठपका ठेवत शिवसेनेतून त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.

शिवाजीराव आढळराव पाटील हे शिवसेनेचे मोठे नेते मानले जातात. पुणे जिल्ह्यात शिवसेना वाढवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांनी 2004 मध्ये शिरुर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर विजय मिळवला होता. त्यानंतर 2009 आणि 2014 लोकसभा निवडणुकीत देखील त्यांनी विजय मिळवला होता. मात्र 2019 मध्ये राष्ट्रवादीच्या डॉ.अमोल कोल्हे यांच्याकडून त्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता.मात्र लोकसभेत पराभव झाल्यानंतर त्यांना शिवसेनेकडून उपनेते पद देण्यात आलं होतं

एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर विविध स्तरातून एकनाथ शिंदे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाल्याचं पाहायला मिळालं. शिवसेनेचे उपनेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी देखील सोशल मीडियावर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी शुभेच्छा दिल्या.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!