……तर महाविकास आघाडीचा जन्मच झाला नसता; उद्धव ठाकरे यांचं मोठं वक्तव्य

293 0

मुंबई: मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे हे आज शिवसेना भवनमध्ये आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया दिली

मी कालच नव्या सरकारचं अभिनंदन केल्याचं यावेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मात्र हे सरकार ज्यापद्धतीने स्थापन झाले, ज्या पद्धतीने एका कथाकथित शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवण्यात आले, तेच तर अडीच वर्षांपूर्वी मी अमित शाह यांना सांगत होतो. जर अडीच वर्ष भाजपाचा आणि अडीच वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असता तर महाविकास आघाडीचा जन्मच झाला नसता असं उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

शिवसेनेला बाजूला ठेऊन शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही असं देखील माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख म्हणाले यावेळी ठाकरे यांच्यासोबत माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि माजी परिवहन मंत्री दिवाकर रावते उपस्थित होते.

Share This News
error: Content is protected !!