संजय राऊत हाजीर हो! ईडीकडून संजय राऊतांच्या चौकशीला सुरुवात

238 0

पत्राचाळ जमीन घोटाळाप्रकरणी ईडीने संजय राऊत यांना हे समन्स बजावलं होतं. ईडीने 28 जून रोजी संजय राऊत यांना चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावलं होतं. पण त्यावेळी त्यांनी ईडीकडे वेळ वाढवून मागितला होता. ईडीने मागितलेली सर्व कागदपत्रे सादर करण्यासाठी संजय राऊत यांनी 14 दिवसांची मुदत वाढवून मागितली होती. ईडीने ही चौकशीसाठी हजर राहण्यासाठी त्यांना 14 दिवसांची मुदतवाढ दिली त्यानुसार आज संजय राऊत हे इडी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले आहेत.

तपास यंत्रणांना सहकार्य करणं माझं कर्तव्य असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

 

राज्यातील गेल्या दहा दिवसांपासून वातवरण चांगलेच तापले आहे. अशातच पत्राचाळ जमीन घोटाळाप्रकरणी ईडीने संजय राऊत यांना हे समन्स बजावलं होतं.

काय आहे प्रकरण ?

पत्राचाळ य़ेथील जागा म्हाडाने विकसनासाठी दिली होती. त्याबदल्यात वाधवान बिल्डर्सला एफएसआय देण्यात आला होता. पण वाधवान बिल्डर्सने एफएसआय इतरांना विकला. त्याबदल्यात पैसे घेतले. तसेच विकसनाच्या नावाखाली बँकेकडून हजारो कोटींचे कर्ज घेतले. त्यातून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला.

याप्रकरणी म्हाडासह इतर बिल्डरांचेही नुकसान झाल्याची तक्रार करण्यात आली. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने याची चौकशी सुरू झाली. प्रविण राऊत यांना त्यानंतर अटक करण्यात आली. राऊतांच्या माध्यमातून संजय राऊतांच्या पत्नीला पन्नास लाख रुपये दिल्याचे चौकशीत समोर आले होते. या प्रकरणात आता संजय राऊतांचाही संबंध असल्याचा ईडीला संशय आहे.

Share This News
error: Content is protected !!