आलिया आणि रणबीर १४ एप्रिल रोजी लग्न बंधनात अडकले. अजूनही त्यांच्या लग्नाच्या चर्चा या सुरुच आहेत. या सगळ्यात आता आलिया भट आणि अभिनेता रणबीर कपूर यांच्या घरी लवकरच एका चिमुकल्या पाहूण्याचे आगमन होणार आहे. नवीन पाहुण्याची चाहूल दर्शवणारा तिने सिंहाच्या कुटुंबाचा प्रातिनिधक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत “आमचं बाळं लवकरच येतं आहे”, असे कॅप्शन दिले आहे.
आलिया भट्ट आणि रणबीर कपूरनं 14 एप्रिल 2022 रोजी लग्नगाठ बांधली. मोजक्या पाहूण्यांच्या उपस्थितीमध्ये रणबीर आणि आलियाचा लग्न सोहळा पार पडला. आलियानं तिच्या विवाह सोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या दोघांच्या लग्नाची चर्चा लग्नानंतर किती दिवस तरी सुरु होती. आता या दोघांच्या लग्नानंतर नवीन पाहुण्याच्या आगमनाबाबत पुन्हा चर्चा सुरु झाली आहे.
आलियानं शेअर केलेल्या फोटोला तिच्या चाहत्यांनी आणि अनेक सेलिब्रिटींनी कमेंट्स करुन शुभेच्छा दिल्या आहेत. आलियानं शेअर केलेल्या फोटोला करण जोहर, मौनी रॉय, रकुलप्रीत सिंह, परिणिती चोप्रा, टायगर श्रॉफ आणि प्रियांका चोप्रा या सेलिब्रिटींनी कमेंट्स करुन रणबीर आणि आलियाला शुभेच्छा दिल्या आहेत.
ब्रह्मास्त्र या चित्रपटाच्या सेटवर आलिया आणि रणबीरच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. रणबीर आणि आलियाचा ब्रह्मास्त्र हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळाली. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्यासोबतच अमिताभ बच्चन, नागार्जुन, मौनी रॉय हे कलाकार ब्रह्मास्त्र या चित्रपटामध्ये प्रमूख भूमिका साकारणार आहेत. नीतू कपूर यांनी सांगतिले की रणबीर आलियाच्या लग्नाला 40 आणि रिसेप्शनला 40 पाहूणे उपस्थित होते. नऊ सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये पहिल्यांदाच प्रेक्षकांना आलिया आणि रणबीरची ऑन स्क्रिन केमिस्ट्री बघायला मिळणार आहे.