शिवसेनेच्या ठाणे जिल्हा प्रमुखपदी केदार दिघेंची नियुक्ती ?

258 0

राज्याच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी सुरू असून एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारले असून शिवसेनेचे 41 आमदारांसह ते गुवाहाटी दाखल झाले आहेत.

एकनाथ शिंदे गटात सामील झालेल्यांमध्ये राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, फलोत्पादन मंत्री संदीपान भूमरे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यासह शिवसेना पाठिंबा देत राज्यमंत्री झालेल्या बच्चू कडू अशा मोठ्या नावांचा समावेश आहे.

याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांना समर्थन दर्शवत शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख नरेश म्हस्के यांनी राजीनामा दिला त्यानंतर ठाणे जिल्हा प्रमुख म्हणून धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांची निवड झाल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर फिरत होत्या या पोस्ट बाबत दिघे यांनी फेसबुक पोस्ट करत आपली भूमिका स्पष्ट केली असून ते फेसबुक पोस्ट मध्ये म्हणतात जय महाराष्ट्र मी केदार दिघे याद्वारे असे नमूद करतो की, समाज माध्यमातून एक पोस्ट व्हायरल केली जात आहे की माझी म्हणजे #केदार #दिघे यांची ठाणे जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पण मी अत्यंत नम्रपणे, प्रामाणिकणे सांगू ईच्छितो की अश्या प्रकारची माझी वा कोणाचीच नियुक्ती अधिकृतपणे या क्षणापर्यंत माननीय शिवसेनापक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे अथवा मा.आदित्यजी ठाकरे अथवा शिवसेना पक्ष यांनी केलेली नाही. या द्वारे मी असे जाहीर करतो की शिवसेना पक्षाचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मी पक्षसाठी काम करीत आहे कृपया कोणाचाही गैरसमज होऊ नये या साठी मी माझी बाजू इथे मांडत आहे. धन्यवाद जय महाराष्ट्र

केदार दिघे यांची फेसबुक पोस्ट खालील लिंक वर 

https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid027c5X4uT4VCjXhp7Z1C7EkwGDBqrVq7wEpwERvXT9PzaAhYvvpWLBYgzyAJ8h1LeVl&id=100044177752137

 

Share This News
error: Content is protected !!