नरेंद्र मोदींच्या कर्तृत्वात अगणित लघुपट निर्मितीची ताकद-चंद्रकांत पाटील

184 0

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कर्तृत्व इतके मोठे आहे की; त्यांच्या कर्तृत्वावर अगणित लघुपट निर्माण होऊ शकतात, असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठच्यावतीने आयोजित ‘कर्मयोगी नमो’ लघुपट स्पर्धेतील विजेत्यांचा रविवारी कोथरुड मधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, नाट्य व सिनेअभिनेते प्रशांत दामले, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, मानसी मागीकर, युवा अभिनेते आरोह वेलणकर, भाजपा पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, सांस्कृतिक आघाडीचे प्रदेश संयोजक ॲड. शैलेश गोजमगुंडे, प्रदेश प्रभारी लक्ष्मण सावजी, भाजपा कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, पुणे शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर यांच्या सह भाजपाचे सर्व पदाधिकारी आणि नागरीक उपस्थित होते.

Share This News
error: Content is protected !!