मोठी बातमी! बंडखोर आमदारांना सीआरपीएफचे जवान सुरक्षा पुरवणार

216 0

बंडखोर आमदारांच्या विरोधात मुंबई, पुण्यासह राज्यभरात शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. बंडखोर आमदारांच्या विरोधात घोषणाबाजीसह पोस्टर्सला काळं फासण्याच्या घटना समोर आल्या आहे.

आज संध्याकाळपर्यंत 15 आमदारांच्या घरी सीआरपीएफचे जवान तैनात होणार असल्याची माहिती  दिली आहे. उद्या राष्ट्रपती राजवट लागली तर काय कराल ? दीपक केसरकरांनी सेनेला दिला थेट इशारा सध्या शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी बंडखोर आमदारांच्या फोटोला काळं फासलं आहे. तर अनेक ठिकाणी आंदोलनही केलं गेलं आहे. अशात कुटुंबीयांना धोका असल्याची तक्रार काही आमदारांनी केली होती.

दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ सोडणार नसल्याचं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केल्यानंतर या सगळ्या घडामोडी नेमक्या कोणत्या दिशेने जात आहेत, याविषयी तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. त्यातच आता आमदारांना केंद्रीय सुरक्षा देण्याचा निर्णय समोर आल्यामुळे त्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Share This News
error: Content is protected !!