गाडी साफ करतोय की तुमचे बँक खाते ? पाहा हा धक्कादायक व्हिडिओ !

508 0

मुंबई- तुमच्या बँक खात्यातील रक्कम ऑनलाईन कशी गायब केली जाते हे आता अनेकांच्या लक्षात आले आहे. पण आता तुमच्या फास्ट टॅगद्वारे तुमच्या बँक खात्यावर डल्ला मारण्याचा नवीन प्रकार उघडकीस आला आहे. याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

टेक्नॉलॉजीमुळे आर्थिक व्यवहार जितके सोपे झाले आहेत, तितकेच ते धोक्याचेही आहेत. तुमच्या बँक खात्यातील रक्कम पळविण्यासाठी स्कॅमर्स अनेक प्रकारच्या क्लुप्त्या वापरतात. या स्कमेर्सचा नवीन प्रकार उघडकीस आला आहे. तुमच्या गाडीच्या काचेवर लावण्यात आलेला फास्टटॅग या स्कॅमर्ससाठी पर्वणी ठरला आहे.

टोल नाक्यावरील वाहनांची गर्दी आणि रांगा टाळण्यासाठी फास्ट टॅगची सुविधा उपलब्ध करण्यात अली आहे. हा एक स्टिकर आहे, ज्यावर एक कोड असतो. हा स्टिकर बँक अकाऊंट किंवा ई-वॉलेटला जोडलेला असतो. जो स्कॅन करून तुमचा टोल घेतला जातो. पण हाच फास्टॅग स्मार्टवॉचनने स्कॅन करून चोरी केली जात असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

https://twitter.com/ishaarorafly/status/1540596372302286848

एक मुलगा कारची काच साफ स्वच्छ करताना दिसत आहे. त्याच्या हातात एक स्मार्टवॉच दिसत आहे. काच साफ करता करता तो हे वॉच फास्टटॅगवर टेकवतो आणि त्यानंतर आपल्या कामाचे पैसे न घेताच तिथून पळू लागतो. कारचालक त्याला हाक मारून मागे बोलवतो. तुझ्या कामाचे पैसे घेणार नाही का? असं विचारतो. मुलाच्या चेहऱ्यावर थोडी भीतीही दिसते आहे. आपली चोरी लक्षात आल्याचे समजताच तो मुलगा तिथून पळ काढताना या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.

Share This News
error: Content is protected !!