राज ठाकरे घरी परतले ! शस्त्रक्रिया यशस्वी, पुढचे काही महिने आराम करण्याचा सल्ला

314 0

मुंबई,- मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर हिप बोनची यशस्वी शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर त्यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. राज ठाकरे यांच्यावर 20 जून रोजी लिलावती रुग्णालयात हिप बोनची शस्त्रक्रिया झाली. राज यांनी फेसबुक पोस्ट शेअर करत आपल्याला डिस्चार्ज मिळाल्याची माहिती दिली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पायाला दुखापत झाली होती. दरम्यान याासाठी त्यांनी नियोजित दौरेही रद्द केले होते. राज ठाकरे यांच्यावरील हिप बोनची शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. दीड तास ही शस्त्रक्रिया पार पडली. आपल्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असल्याचेही त्यांनी ट्वीटरवर माहिती दिली आहे.

डॉक्टरांनी त्यांना पुढचे दोन ते तीन महिने आराम करण्याचा सल्ला दिला आहे. या दरम्यान राज ठाकरे यांना कोणतीही सभा, भाषण किंवा मीटिंग घेता येणार नाही असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. राज ठाकरे यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केल्यानंतर डॉ. जलील पारकर आणि डॉ. विनोद अग्रवाल यांनी ही माहिती दिली आहे.

ट्वीटरवर राज ठाकरे म्हणतात की , ”आपल्या आर्शिवादाने आणि प्रार्थनेने माझी शस्त्रक्रिया व्यवस्थितरीत्या पार पडली आहे. काही वेळापूर्वीच, रुग्णालातून बाहेर पडून मी घरी पोहचलो आहे. आपले आर्शिवाद आणि प्रेम असेच कायम राहो! आपला नम्र राज ठाकरे.” दरम्यान त्यांनी पोस्ट करण्यासाठी भगवा रंग निवडल्याने हा ही चर्चेचा विषय बनला आहे. अशा आशयाचे ट्विट शेअर करत राज ठाकरे यांनी डिस्चार्ज मिळाला असल्याची माहिती दिली आहे.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide