असे काय आहे ‘ काळ्या पाण्यात ‘ ज्यामुळे सेलिब्रिटींसाठी आहे एक नंबरचे चॉईस

426 0

सिनेमा आणि त्याचा इन्फ्लुईन्स सगळीकडे आहे. कुठलाही नवीन पिक्चर आला की, त्यांच्या कपड्यांपासून ते प्रत्येक गोष्टींची फॅशन बनते. त्यांच्या या ट्रेंड मध्ये ‘ काळ्या पाण्याची ‘ भर पडली आहे. काळ पाणी याची मार्केटमधील एका बिस्लेरी ची किंमत बघून आता चाहत्यांच्या मनात देखील कुतूहल निर्माण झाले आहे. चला तर मग काळ पाणी म्हणजे नेमके काय हे जाणून घेऊया.

पाणी हे जीवन आहे असे म्हंटले जाते. जगण्यासाठी पाणी हा खूप आवश्यक घटक आहे .शरीरात पाण्याचे प्रमाण हे ६० टक्के आहे. पाणी हे शरीराचे तापमान योग्य ठेवण्यासाठी मदत करते, विषारी पदार्थ बाहेर काढायला मदत करते तसेच पचनसंस्था साठी सुध्दा पाणी खुप आवश्यक आहे. यात ‘काळ पाणी ‘ हे सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे. काळ पाणी म्हणजे काय ?असे कोणते घटकांमुळे त्याची किंमत बाजारात बाकी बिस्लेरी पेक्षा जास्त आहे . चला पाहुया.

काळ अल्कलाईन पाण्यातील रेणू लहान असतात व त्यामुळे ते शरीरातील पेशींद्वारे अधिक सोप्या पद्धतीने शोषले जातात.

काळ पाणी पिल्याने ऍसिडिटी कमी होते.

अँटीएजिंग हा गुणधर्म असल्याने हे पाणी पिल्यास आपली त्वचा आणि केसांची गुणवत्ता सुधारू शकते.

काळ्या पाण्याच्या सेवनाने रोगप्रतिकार शक्ती वाढते.

हे पाणी कॅलरी बर्न करण्यास मदत करते.

0 ते १४ च्या प्रमाणात साध्या पाण्याचा पीएच ६ ते ७ दरम्यान असतो .पण क्षारिय पाण्याचा पीएच ७ च्या वर असतो .काळ्या पाण्यात ७० पेक्षा जास्त खनिज असल्यामुळे असे म्हणतात की दीर्घकालीन आरोग्य लाभते. परंतु त्याबाबत अजून तरी पुरेसं शोध लागलेला नाही.

Share This News
error: Content is protected !!