एकनाथ शिंदे गटाला भाजपाची मोठी ऑफर ? शिंदे गटाला 8 कॅबिनेट तर 5 राज्यमंत्रीपदं मिळण्याची शक्यता

484 0

मुंबई- शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाराष्ट्रातील राजकारण पेटले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोणत्याही क्षणी राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. शिंदे यांना त्यांच्या बंडाची पुरेपूर किंमत भाजपकडून मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

शिवसेनेशी बंड पुकारलेले एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या 41 आमदारांनी बंड पुकारले असून यामध्ये राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह शिवसेनेला पाठिंबा देत राज्यमंत्री झालेले बच्चू कडू यांचा देखील समावेश आहे.

भाजपाकडून शिंदे गटाला 8 कॅबिनेट तर 5 राज्यमंत्रीपदं मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद किंवा गृहमंत्रीपद आणि श्रीकांत शिंदे यांना थेट केंद्रामध्ये मंत्रिपद देण्याची ऑफर देण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. शिवाय बंड करणाऱ्या आमदारांना महामंडळे किंवा मंत्रीपदे देऊन खुश केले जाणार आहे, असेही सांगण्यात येत आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे एक-दोन दिवसात राज्यपालांना भेटून आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र देणार असून देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने सरकार स्थापनेचा दावा करणार असल्याचे समजते

 

 

 

 

 

 

 

 

Share This News
error: Content is protected !!