महाराष्ट्र हितासाठी आता निर्णय घेणं गरजेचं; उद्धव ठाकरे यांच्या आवाहनानंतर एकनाथ शिंदेंचं उत्तर

215 0

बंडखोरांपैकी एकानेही मला समोर येऊन सांगावं, मी मुख्यमंत्रिपदी नको त्याक्षणी मी राजीनामा द्यायला तयार आहे. फक्त ज्यांना मी नकोय, त्यांनी मला सांगावं. मी राजीनाम्याचं पत्र तयार करुन ठेवलंय. मला कोणताही मोह नाही. असा भावनिक संदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुकच्या माध्यमातून दिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर प्रथमच आपली भूमिका मांडली. यावेळी भाजपसोबत जाण्याचा कोणताच विचार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी देखील मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला जोरदार प्रतिउत्तर दिलं आहे.

गेल्या अडीच वर्षात महाविकासआघाडी सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला,आणि
शिवसैनिक भरडला गेला असून घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे,शिवसेनेचे मात्र पद्धतशीर
खच्चीकरण होत असल्याचं शिंदे यांनी म्हंटलं आहे.

पक्ष आणि शिवसैनिक टिकविण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक असून महाराष्ट्र हितासाठी आता निर्णय घेणं गरजेचं असल्याचं मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं आहे.

Share This News
error: Content is protected !!