महत्वाची बातमी ! शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोदपदी आमदार भरत गोगावले यांची नियुक्ती, एकनाथ शिंदे यांनी ट्विट करून दिली माहिती

280 0

मुंबई- शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी नवे ट्विट करून शिवसेनेला आणखी एक धक्का दिला आहे. शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोदपदी आमदार भरत गोगावले यांची नियुक्ती केल्याचे शिंदे यांनी जाहीर केले आहे.

शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाने महाविकास आघाडीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. बंडखोर आमदारांनी त्वरित परत यावे असा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे. मात्र या इशाऱ्याचा बंडखोर आमदारांवर काही परिणाम झाल्याचे दिसत नाही.

दरम्यान, महाड विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांची शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोदपदी नियुक्ती केल्याचे शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. एकनाथ शिंदे यांनी याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे. तसेच सुनील प्रभू यांनी आजच्या आमदारांच्या बैठकीबद्दल काढलेले आदेश कायदेशीरदृष्ट्या अवैध असल्याचे देखील म्हटले आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!