36 आमदार सोबत एकूण संख्याबळ 50 पर्यंत जाईल – बच्चू कडू

233 0

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्याच विरोधात बंडाचे अस्त्र उगारलं असून शिंदे शिवसेनेच्या आमदारांसह सुरत मध्ये दाखल झाले होते त्यानंतर शिंदे आज गुवाहटी मध्ये दाखल झाले आहेत.

शिंदे बरोबर असणाऱ्या आमदारांमध्ये राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह प्रहारचे आमदार आणि शिवसेनेला पाठिंबा देत राज्यमंत्री झालेल्या बच्चू कडू यांचा देखील समावेश आहे. याविषयावर बच्चू कडू यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली असून ते म्हणाले आम्ही विधानपरिषदेला मतदान केलं होतं. मात्र अचानक वातावरण तयार झालं आणि दोन तृतीयांश आमदार फुटल्याने शिवसेनेत आलो. सगळे आमदार स्वखुशीने इथे आले आहेत. 36 आमदार सोबत, त्यापैकी शिवसेनेचे 33 आणि अपक्ष 3, एकूण संख्याबळ 50 पर्यंत जाईल, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे.

तसेच पुढे ते म्हणाले कि, सध्या आम्ही गुवाहाटीमध्ये आहे. आज संध्याकाळपर्यंत समजेल. भाजपचे संजय कुटे आमच्यासोबत आहेत. व्यक्तिगत नाराजी नाही. निधी वाटपात विषमता होती. शिवसेनेच्या आमदारांकडे लक्ष द्यायची गरज होती. मी मुख्यमंत्र्यांना स्वत:हून फोन केला होता, असंही कडू यावेळी म्हणाले. यानंतर आता उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण राज्याच लक्ष लागलं आहे.

Share This News
error: Content is protected !!