बंडानंतर एकनाथ शिंदे यांची आली पहिली प्रतिक्रिया, आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत

196 0

मुंबई -एकनाथ शिंदेंच्या राजकीय बंडानंतर आता त्यांच्या प्रत्येक हालचालीवर राज्याचे लक्ष लागले आहे. एकनाथ शिंदे यांनी जवळपास 20 तासानंतर पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सत्तेसाठी बाळासाहेबांच्या शिकवणीशी प्रतारणा करणार नाही असे शिंदे यांनी आपल्या ट्विटमधून म्हटले आहे.

शिवसेनेत पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर बंड झाले आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आता राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या स्थिरतेबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. शिवसेनेच्या गोटातील हालचालीही चांगल्याच वाढल्या आहेत. शिवसेने तातडीची बैठक घेत शिवसेनेने एकनाथ शिंदे यांना विधान सभेतील गटनेतेपदावरून हटवलं आहे. त्यांच्या ठिकाणी गटनेतेपदी आमदार अजय चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर गुजरातमध्येह अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत.

त्यातच एकनाथ शिंदे यांनी ट्विट करून ठाकरे सरकारला एक प्रकारे इशारा दिला आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत… बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही

एकनाथ शिंदे यांच्या ट्वीटनंतर आता अनेक अर्थ काढले जाऊ लागले आहेत. एकनाथ शिंदे आता आनंद दिघे यांच्या नावाने स्वत:ची संघटना स्थापन करू शकतात. त्यातून भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारला पाठिंबा देऊ शकतात. एकनाथ शिंदे यांनी ट्वीटनुसार त्यांनी हिंदुत्वाची भूमिका मांडली असून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार चालवण्यास अनुत्सुक असल्याचे संकेत दिले आहेत.

विशेष म्हणजे शिवसेनेवर नाराज असलेले एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटमध्ये पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा एका शब्दानेही उल्लेख केला नाही. केवळ बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि आनंद दिघे यांच्या शिकवणीचा उल्लेख करीत हिंदुत्व त्यांच्याप्रमाणेच जोपासले जावे. सध्या पक्षाला आपल्या उद्देशाचा विसर पडल्याची आठवणच जणूकाही शिंदे यांनी करुन दिली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!