एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांची ही घ्या यादी

368 0

मुंबई- राज्यसभा निवडणुकीत बसलेल्या धक्क्यानंतर विधान परिषदेतील विजयानंतर सावरलेल्या शिवसेनेला पुन्हा धक्का बसला आहे. शिवसेनेमधील क्रमांक दोनचे नेते, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आपल्या समर्थक आमदारांना घेऊन गुजरातला मध्यरात्री निघून गेले. काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबरचं सरकार अमान्य असून शिवसेनेने भाजपबरोबर जावे तरच शिवसेनेसोबत असल्याची भूमिका एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांनी घेतल्याची माहिती मिळत आहे.

या सर्व घडामोडीनंतर एकनाथ शिंदे यांच्याबरोबर नेमके किती आमदार आहेत याबाबद्दल उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. याबाबत विश्वसनीय सूत्रांकडून आमदारांची एक यादी समोर आली आहे

मागााठाणे आमदार प्रकाश सुर्वे
सिल्लोडचे आमदार आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार.
पैठणचे आमदार आणि राज्यमंत्री संदिपान भुमरे
औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट
कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूत
वैजापूरचे आमदार प्रा. रमेश बोरनारे
नांदेडचे बालाजी कल्याणकर
अलिबागचे आमदार महेंद्र दळवी
कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे
महाडचे आमदार भरतशेठ गोगावले
आटपाडीचे आमदार अनिल बाबर
भुदरगडचे आमदार प्रकाश अबिटकर
पाटणचे आमदार आणि गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई
सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील
साताऱ्यातील कोरेगावचे आमदार महेश शिंदे
अंबरनाथचे आमदार बालाजी किणीकर
पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा
भिवंडी ग्रामिणचे आमदार शांताराम मोरे
कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर
पाचोराचे आमदार किशोर आप्पा पाटील
मेहकरचे आमदार संजय रायमुलकर
बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!