मुंबई- विधानपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेच्या गोटात मोठा भूकंप झाला आहे. त्यामुळे ठाकरे सरकारच्या स्थैर्यावरच प्रश्चचिन्ह उपस्थित झाले आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे २९ आमदार नॉट रिचेबल असल्याचं समोर येत आहे. एकनाथ शिंदे सध्या आमदारांसह सूरतमधील हॉटेलमध्ये थांबलेले आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काल संध्याकाळी 5 वाजता एकनाथ शिंदेंसब सर्व आमदारांनी प्लानिंग करण्यात आलं. त्यानंतर मुंबईतून सूरतला जाणाऱ्या फ्लाईटचं बुकिंग करण्यात आलं. त्यासोबतच, एअरपोर्टजवळ असणाऱ्या हॉटेलमध्ये बुकिंग करण्यात आलं. सर्वात आधी 11 आमदार रात्री वाजेपर्यंत सूरतमधील हॉटेलमध्ये पोहोचले. त्यापाठोपाठ दीड वाजता एकनाथ शिंदेंसह आणखी काही आमदार हॉटेलमध्ये पोहोचले. एकनाथ शिंदे यांच्यासह २५ आमदार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांची भाजप नेत्यांशी चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे यानंतर होणाऱ्या राजकीय घडामोडींकडे आता लक्ष लागलं आहे.
सएकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातही शिवसेनेला खिंडार पडण्याची शक्यता आहे. तिन्ही जिल्ह्यातील बहुतांश आमदार, खासदार एकनाथ शिंदेंसोबत असल्याचं समोर येत आहे. त्यामुळे शिवसेनेच्या बालेकिल्ल्यांना खिंडार पडण्याची शक्यता आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या ठाण्याला खिंडार पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
संजय राऊत यांचा एकनाथ शिंदे यांना इशारा
मुंबई:शिवसेना ही निष्ठावंतांची सेना आहे. पदांसाठी आणि सत्तेसाठी विकली जाणारी शिवसेना नाही. शिवसेनेवर वार म्हणजे महाराष्ट्रावर वार आहे. त्यामुळे शिवसेनेत महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसणारी औलाद निर्माण होणार नाही. असे जे कोणी निर्माण झाले त्यांची अवस्था तुम्ही पाहातच असाल, असे वक्तव्य करत शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना अप्रत्यक्षपणे इशारा दिला आहे.
नॉट रिचेबल आमदार :
साताऱ्याचे आमदार महेश शिंदे
सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील
उमरग्याचे आमदार ज्ञानराज चौगुले
पंराड्याचे आमदार तानाजी सावंत
बुलढाण्याचे आमदार संजय रायमूलकर
मेहकरचे आमदार संजय गायकवाड
बाळापूरचे आमदार नितीन देशमुख
सिल्लोडचे आमदार आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार
पैठणचे आमदार आणि राज्यमंत्री संदिपान भुमरे
औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट
कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूत
वैजापूरचे आमदार प्रा. रमेश बोरनारे
भुदरगडचे आमदार प्रकाश आबिटकर
महाडचे भरत गोगावले