मिशीवाल्या मावळ्याचा बळी जाणार; अनिल बोंडेंच्या ट्विटने राजकीय वर्तुळात खळबळ
विधापरिषदेच्या 10 जागांसाठी आज मतदान होत असून सर्वच राजकीय पक्षांनी या विधान परिषद निवडणुकीसाठी कंबर कसली आहे.
विधान परिषदेच्या दहा जागांसाठी आज मतदान होत आहे. महाविकास आघाडी तसेच भाजपाचे आमदार मतदान करत आहेत. या निवडणुकीसाठी गुप्त मतदान पद्धती असल्यानं सर्वच राजकीय पक्षांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.
काहीही झालं तरी आमचेच पाच उमेदवार निवडून येणार असा दावा भाजपाकडून केला जातोय. तर दुसरीकडे निवडणूक चुरशीची होणार असली तरी आमचा विजय होणार असं महाविकास आघाडीकडून म्हटलं जात आहे. दोन्ही बाजूने विजयाचा दावा केला जात असताना भाजपाचे राज्यसभेतील खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी सूचक ट्वीट केले आहे. “काळ आला होता भाऊ किंव्हा भाई वर, पण मुख्यमंत्रिपद वाचविण्यासाठी बळी जाणार मिशीवाल्या मावळ्याचा,” असं सूचक ट्वीट अनिल बोंडे यांनी केले आहे.
काळ आला होता भाऊ किंव्हा भाई वर, पण मुख्यमंत्री पद वाचविण्यासाठी बळी जाणार मिशीवाल्या मावळ्याचा…#MLCElection2022 #MahaVikasAghadi
— Dr. Anil Bonde (@DoctorAnilBonde) June 20, 2022
बोंडे यांच्या ट्वीटनंतर मिशीवाला मावळा कोण असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
