दगडी चाळ २ चा टिझर प्रकाशित, पुन्हा एकदा अरुण गवळी गरजणार ‘चुकीला माफी नाही’ (व्हिडिओ)

516 0

मुंबई – अरुण गवळी म्हणजे मुंबईचा डॉन. अरुण गवळी डॅडी या टोपण नावाने परिचित आहे. अरुण गवळीची दगडी चाळ म्हणजे मुंबईच नाही तर महाराष्ट्रासाठी कुतूहलाचा विषय. २०१५ मध्ये गाजलेल्या दगडी चाळ या मराठी चित्रपटाचा सिक्वल येणार असून त्याचा टिझर नुकताच प्रकाशित झाला आहे.

बॉलिवूड निर्माती संगीता अहिर यांनी ‘दगडी चाळ’च्या निमित्ताने मराठी चित्रपटांच्या निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं. पहिल्याच सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळाला. अरुण गवळीचे व्यक्तिमत्व म्हणजे डोक्यावर गांधी टोपी, पांढरा शुभ्र शर्ट-पायजमा, झुपकेदार मिशा, नजरेत आगीच्या ज्वाला, काटक शरीरयष्टी. पोलिसांसाठी अरुण गवळी हा कुख्यात गुन्हेगार असला तरीही दगडी चाळीसाठी तो रॉबिनहूड आहे.

याचा सिनेमाचा सिक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असून अरुण गवळीच्या भूमिकेत पुन्हा दिसणार आहे अभिनेता मकरंद देशपांडे

नुकतीच सोशल मीडियावर या सिनेमाच्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा करण्यात आली आहे. मंगलमूर्ती फिल्म्स आणि संगीता अहिर निर्मित, चंद्रकांत कणसे दिग्दर्शित ‘दगडी चाळ २’ हा सिनेमा येत्या १८ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तुफान कोसळणारा पाऊस आणि अनेक लोकांच्या घोळक्यातून समोर येणारे अरुण गुलाब गवळी म्हणजेच मकरंद देशपांडे यांची दमदार एन्ट्री पुन्हा एकदा प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणार आहे, हे नक्की.

Share This News
error: Content is protected !!