आपला महाराष्ट्रब्रेकिंग न्यूजराजकारण

विधानपरिषदेच्या रणसंग्रामाला सुरुवात; दहाव्या जागेवर भाजपा की महाविकास आघाडी कोण मारणार बाजी ?

विधान परिषदेच्या दहा जागांची निवडणूक आज होत असून विधान परिषदेतेच्या मतदानाला सुरूवात झाली आहे

दहावी जागा महाविकास आघाडीच्या खात्यात जाणार की राज्यसभा निवडणुकीप्रमाणे भाजप चमत्कार करणार का याबाबत प्रचंड उत्कंठा लागली आहे.

भाजपाकडून प्रवीण दरेकर,राम शिंदे,श्रीकांत भारतीय,उमा खापरे तर शिवसेनेकडून सचिन आहीर, आमश्या पाडवी,राष्ट्रवादीकडून रामराजे निंबाळकर,एकनाथ खडसे आणि काँग्रेस कडून भाई जगताप आणि चंद्रकांत हांडोरे विधान परिषदेच्या रिंगणात आहेत.