पटनाहून दिल्लीला जाणाऱ्या स्पाईस जेट विमानानं घेतला पेट; प्रवासी सुखरुप

211 0

पटनाहून दिल्लीला जाणाऱ्या स्पाईस जेटच्या  विमानाने पेट घेतला. स्पाईसजेटचे विमान Sg 725 विमानाला ही आग लागली. या आगीची माहिती मिळताच पाटणा विमानतळावरील सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

पायलटनं प्रसंगावधान राखून सर्व 185 प्रवाशांचा जीव वाचला आणि पुढील अनर्थ ठळला आहे.

पटनामधील अधिकाऱ्यांनी मीडियाला दिलेल्या माहितीनुसार विमानानं उड्डाण घेताच त्यामधील इंजिनातून धूर बाहेर पडत असल्याचं दिसले. यानंतर विमान तात्काळ सुरक्षितपणे उतरवण्यात आले असून विमानातील सर्व प्रवासी सुखरूप आहेत. दरम्यान विमानाच्या इंजिनाला आग कशी लागली हे अद्याप समजलेलं नाही.

 

Share This News
error: Content is protected !!