Breking News ! केतकी चितळे प्रकरणी केंद्रीय महिला आयोगाची पोलीस महासंचालकांना नोटीस

464 0

मुंबई- महाराष्ट्रात गाजलेल्या केतकी चितळे प्रकरणाला नवी कलाटणी मिळाली आहे. केंद्रीय महिला आयोगाने याबाबत राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना नोटीस बजावली आहे. तसेच पोलीस महासंचालकांना आयोगासमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी कोठडीत असलेल्या केतकी चितळेला दिलासा मिळाला आहे. तिला ऍट्रॉसिटी प्रकरणात जामीन मिळाला असून २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर तिची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणात आणखी एक अपडेट आली आहे की,
केंद्रीय महिला आयोगाने याबाबत राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना नोटीस बजावली आहे. त्यामुळे या प्रकरणात महिला अयोग्य काय निकाल देणार ? पोलिसांच्या समोरील अडचणी वाढणार का ? असे प्रश्न विचारण्यात येत आहेत. या प्रकरणात महिला आयोगाने नोटीस बजावल्यामुळे हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे.

काय आहे केतकी चितळे प्रकरण ?

गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेत्री केतकी चितळेने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत एक वादग्रस्त पोस्ट टाकली. त्यानंतर केतकी चितळेविरोधात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले. तिला सर्वात आधी नवी मुंबईतील कळंबोली पोलिसांनी अटक केली. त्यानंतर तिचा ताबा हा ठाणे पोलिसांना देण्यात आला. त्यानंतर कोर्टाने केतकीला कोठडी सुनावली. मात्र याचदरम्यान केतकीवर गुन्हे दाखल होण्याची मालिका ही सुरूच राहिली. केतकीवर राज्यात जवळपास 20 पेक्षाही जास्त ठिकाणी याच प्रकरणात गुन्हे दाखल झाले. तर दुसरीकडे एका अॅट्रोसिटीच्या गुन्ह्यातही तिला पोलिसांनी पुन्हा ताब्यात घेतलं होतं. तिने अनेक दिवस हे विविध प्रकरणात जेलमध्ये घालवले आहेत.

दरम्यान, केतकीने आपली अटक बेकायदेशील असल्याचा दावा करत हायकोर्टात दुसरी याचिका दाखल केली आहे.

Share This News
error: Content is protected !!