पुणे- स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईत एका मॉडेलसह ६ महिलांची सुटका केली आहे.
मागील काही दिवसांपासून परिसरात मोठ्या प्रमाणात मसाज सेंटर, स्पा सेंटर सुरु झाले आहेत. अनेक ठिकाणी मसाजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे उघडकीस आलेले आहे. असाच प्रकार पुण्याच्या औंध भागात घडला आहे. औध परिसरातील चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीत द व्हाईट व्हिलो स्पा नावाचे मसाज सेंटर आहे.
या ठिकाणी वेश्याव्यवसाय चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा कक्षाच्या पथकाने एका बनावट ग्राहकाला पाठवून याची खात्री करण्यात आली. त्यानंतर बुधवारी संध्याकाळी पुणे पोलिसांनी कारवाई करून ६ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीला अटक केली आहे. सह पीडित महिलांसहित एका मॉडेलची सुटका करण्यात आली आहे.
एप्रिल महिन्यात याच स्पा सेंटरमधून चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पुणे शहर पोलिसांनी पर्दाफाश केला होता. पाप्रकरणी पोलिसांनी स्पाच्या व्यवस्थापकाला अटक केली होती, तर थायलंडमधील चार महिलांसह सहा महिलांची सुटका करण्यात आली होती.