नवीन गॅस कनेक्शन महागले ! नवीन कनेक्शनसाठी आता ग्राहकांना मोजावे लागणार एवढे पैसे

352 0

मुंबई – पेट्रोलियम कंपन्यांनी नवीन घरगुती गॅस कनेक्शनच्या किमती वाढवल्या आहेत. यापूर्वी सिलिंडरचे कनेक्शन घेण्यासाठी १४५० रुपये मोजावे लागत होते. पण आता यासाठी तुम्हाला २२०० रुपये द्यावे लागणार आहेत. कंपन्यांनी त्यामध्ये तब्बल ७५० रुपयांची वाढ केली आहे. हा बदल १६ जूनपासून लागू होणार आहे.

इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या कंपन्यांच्या वतीने १४.२ किलो वजनाच्या गॅस सिलिंडरच्या कनेक्शनमध्ये प्रति सिलिंडर ७५० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. जर तुम्ही दोन सिलिंडर कनेक्शन घेतले तर तुम्हाला १५०० रुपये अतिरिक्त द्यावे लागतील. म्हणजेच, यासाठी तुम्हाला ४४०० रुपये सिक्युरिटी म्हणून भरावे लागतील. यापूर्वी यासाठी २९०० रुपये मोजावे लागत होते.

त्याचप्रमाणे रेग्युलेटर घेण्यासाठी ग्राहकांना १५० रुपयांऐवजी २५० रुपये द्यावे लागणार आहेत. तसेच ५ किलोच्या सिलेंडरची सुरक्षा आता ८०० ऐवजी ११५० करण्यात आली आहे. केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना ‘प्रधानमंत्री उज्ज्वला योजना’ या नव्या दरांच्या अंमलबजावणीमुळे ग्राहकांनाही धक्का बसणार आहे. उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांनी त्यांच्या कनेक्शनवर सिलिंडर दुप्पट केल्यास त्यांना दुसऱ्या सिलिंडरसाठी वाढीव सिक्युरिटी जमा करावी लागेल. मात्र, एखाद्याने नवीन कनेक्शन घेतल्यास त्याला पूर्वीप्रमाणेच सिलिंडरची सिक्युरिटी द्यावी लागणार आहे.

नवीन कनेक्शन घेताना खालीलप्रमाणे पैसे द्यावे लागणार आहेत.

विनाअनुदानित गॅस सिलिंडरची किंमत– १०६५ रुपये
सिलेंडरसाठी सुरक्षा रक्कम— २२०० रुपये
रेग्युलेटरसाठी सुरक्षा— २५० रुपये
पासबुकसाठी —-२५ रुपये
पाईपसाठी—-१५० रुपये
आता नवीन कनेक्शन मिळणार ३६९० रुपयांत

आता तुम्ही एका सिलिंडरसह नवीन गॅस कनेक्शन घेण्यासाठी गेलात तर त्यासाठी तुम्हाला ३६९० रुपये मोजावे लागतील. याशिवाय स्टोव्ह घ्यायचा असेल तर त्यासाठी वेगळे पैसे द्यावे लागतील. गॅस सिलिंडरच्या किमतीमध्ये वाढ केल्यामुळे अगोदरच ग्राहकांच्या खिशाला फटका बसलेला असताना नवीन कनेक्शनसाठी सुद्धा जाडा पैसे मोजावे लागणार असल्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!