मैत्री फाऊंडेशन व राजस सोसायटीच्या रक्तदान शिबिरात 52 जणांचे रक्तदान

341 0

पुणे- शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मैत्री फाऊंडेशन, पुणे व राजस सोसायटी, कात्रज यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात ५२ जणांनी रक्तदान केले.

या शिबिराचे आयोजन करण्यासाठी राजस सोसायटीचे अध्यक्ष हेमंत धायबर, सचिव सचिव संतोष कामठे, दुष्यन्त घाटगे, मैत्री फाऊंडेशनचे सिद्धेश निकम, प्रतीक सितापुरे, नीरज शर्मा, अथर्व जाधव, मयूर सुतार, विशाल पंचरस, शिवम् म्हेत्रे, ब्रिजेश विश्वकर्मा,सोनाली चाळके यांनी विशेष परिश्रम घेतले.

पुना सिरॉलॉजीकल ब्लड बँकेचे चंद्रशेखर शिंदे यांनी व्यवस्था पाहिली.

Share This News
error: Content is protected !!