मुंबई- सर्वाधिक पसंतीचा प्लॅन बंद करण्याचा निर्णय रिलायन्स जिओने घेतला आहे. त्यामुळे ग्राहकांना आता जास्तीचे पैसे आकारून प्लॅन खरेदी करावा लागणार आहे. त्यामुळे ग्राहकांची मोठी निराशा झाली आहे.
TelecomTalk च्या अहवालानुसार, रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांसाठी रु. 749 आणि रु. 899 चे दोन प्लॅन ऑफर केले होते. दोन्ही प्लॅनमध्ये समान फायदे होते. आता कंपनीने 749 रुपयांचा प्रीपेड प्लॅन बंद केला. याऐवजी ग्राहकांना JioPhone प्रीपेड 899 रुपयांच्या प्लॅनचा पर्याय दिला आहे. हा प्लॅन 150 रुपयांनी महाग आहे. त्यामुळे आता जुन्या ऑफरसह हा प्लॅन घ्यायचा असेल तर अतिरीक्त 150 रूपये भरावे लागणार आहेत.
काय आहे हा प्लॅन ?
JioPhone च्या 899 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनबद्दल बोलायचे झाले तर, यामध्ये यूजर्सना एकूण 24GB डेटा दिला जातो. वापरकर्त्यांना दर 28 दिवसांनी 2GB हायस्पीड डेटा दिला जातो. हाय-स्पीड डेटा संपल्यानंतर, वेग 64Kbps पर्यंत घसरतो. या प्लॅनची एकूण वैधता 336 दिवसांची आहे. यामध्ये यूजर्सना 28 दिवसांचे 12 सायकल मिळतात. ज्यामध्ये प्रत्येक सायकलमध्ये 50 SMS आणि 2GB डेटा दिला जातो. याशिवाय जिओ अॅप्सचे सबस्क्रिप्शनही दिले जाते. या प्लानमध्ये यूजर्सना अनलिमिटेड कॉल्सचा पर्याय मिळतो.