टेबल टेनिसमध्ये महाराष्ट्राला दोन सुवर्ण पदकं

366 0

टेबल टेनिसमध्ये मुलींच्या दुहेरीत दिया चितळे आणि स्वस्तिका घोष यांच्या जोडीने हरियाणाच्या प्रिथोकी चक्रवर्ती आणि सुहाना सैनी यांना अंतिम सामन्यात हरवून सुवर्णपदक पटकावले. १४-१२, ११-०९, ११-६ अशी तीन सेटमध्ये त्यांनी ही कामगिरी केली.

पहिल्या सेटपासूनच दिया आणि स्वस्तिका आक्रमक खेळ करीत होते. त्यांचे फोरहॅड टॉपस्पिन फटके खेळताना हरियानाच्या खेळाडूंची त्रेधा उडाली. पहिल्या सेटमध्ये महाराष्ट्र १४ तर हरियाना १२वर होता. दुसरा सेट दिया आणि स्वस्तिकाने ११-०९ असा जिंकला. तिसऱ्या सेटमध्ये हरियानाच्या खेळाडूंनी थोडाफार प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सामन्यात काही काळ रंगत वाढली. सुरूवातीचे चार गुण घेत हरियानाने आघाडी घेतली. परंतु दिया आणि स्वस्तिकाने त्यांचे संरक्षण भेदून काढले. आणि तिसरा सेट ११-०६ असा जिंकला.

दियाची जर्मनीत प्रॅक्टीस, कॉमनवेल्थसाठी निवड

दियाची कॉमनवेल्थ गेमसाठी निवड झाली आहे. तिला जर्मनीचे प्रशिक्षक आहेत. वर्षातून काही महिने ती जर्मनीत सराव करते. दिया आणि स्वस्तिका या गेल्या सात वर्षांपासून एकत्र सराव करतात. त्यामुळे दोघींमध्ये चांगला ताळमेळ आहे. दोघीही आक्रमक आहेत. त्यांचा संरक्षणावर कमी भर असतो. फोरहँड टॉप स्पीन हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.

Share This News
error: Content is protected !!