ये तो बस्स झाँकी हैं, पुणे महापालिका बाकी हैं!’ – चंद्रकांत पाटील

453 0

‘राज्यसभा निवडणुकीत भाजपच्या दणदणीत विजयानंतर सर्वच कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित झाला आहे. त्यामुळे ‘ये तो बस्स झाँकी हैं, पुणे महापालिका बाकी हैं!’

https://twitter.com/ChDadaPatil/status/1535901669367484417?t=k7IXEgItJSFR-5x6AG59Zg&s=19

 

पुण्यातील भाजप कार्यकर्त्यांनी विजयोत्सवाचं आयोजन केलं होतं. कोथरुड परिसरातील शिवाजी पुतळ्याजवळ कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. यावेळी चंद्रकांतदादा पाटील यांचा सत्कार करण्यात आला. तसेच एकमेकांना पेढे भरवून विजयाचा आनंद साजरा करण्यात आला. यानंतर आ. पाटील यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

 

राज्यसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या विजयाने कार्यकर्त्याचा उत्साह द्विगुणित झाला आहे. या निवडणुकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार कोल्हापूरचे पैलवान धनंजय महाडिक यांनी जो डाव टाकला, त्यामुळे संजय राऊतांनाही चितपट व्हावे लागले, असं ते म्हणाले.

यावेळी आमदार माधुरी मिसाळ, पुणे शहर भाजपा अध्यक्ष जगदीश मुळीक, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, शहर सरचिटणीस दीपक पोटे, राजेश येनपूरे, दत्ताभाऊ खाडे, युवा मोर्चा अध्यक्ष राघवेंद्र मानकर, पुणे शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर, भाजपा कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, कसबा मतदारसंघाचे अध्यक्ष प्रमोद कोंढरे यांच्या सह भाजपाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!