शिवसेनेच्या ‘या’ आमदाराने भाजपाला मदत केली म्हणून… , भाजपच्या आमदाराचा खळबळजनक दावा

423 0

मुंबई- ज्या सहाव्या जागेसाठी राज्यात राजकारण निर्माण झाले होते ती सहावी जागा मिळवत भाजपने विजयाचे सेलिब्रेशन केले. एकीकडे भाजपाने घोडेबाजार केल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे तर दुसरीकडे भाजपला या राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेच्या आमदाराने भरपूर मदत केल्याचा दावा भोकरदनचे भाजपचे आमदार संतोष दानवे यांनी केला आहे.

राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये मोठे राजकीय नाट्य पाहायला मिळाले. अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत भाजपने सहावी जागा आपल्या पदरात पडून घेतली आहे. एकीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या रणनीतीची सर्वत्र कौतुक होत आहे तर दुसरीकडे भोकरदनचे भाजपचे आमदार संतोष दानवे यांनी केलेल्या दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

राज्यसभा निवडणुक आम्हीच जिंकणार असा दावा करत महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजप आमदार संतोष दानवे आमच्यासोबत असल्याचा दावा केला होता. मात्र सहाव्या जागेवर झालेल्या शिवसेनच्या पराभवानंतर संतोष दानवे यांनी सत्तार यांना प्रत्युत्तर दिले आहे. गद्दारांच्या यादीत पहिलं नाव अब्दुल सत्तारांचं होतं, अब्दुल सत्तारांनी आम्हाला या राज्यसभा निवडणुकीत भरपूर मदत केली. अपक्ष आमदारांच्या मतांची जुळवाजुळव करण्यासाठी स्वत: अब्दुल सत्तारांनी खूप प्रयत्न केले. त्याबद्दल मी अब्दुल सत्तारांचे आभार मानतो, अशीच मदत त्यांनी विधान परिषदेलाही करावी असा खोचक टोला संतोष दानवे यांनी लगावला आहे. ते जालन्यामध्ये माध्यमांशी बोलत होते.

अब्दुल सत्तार हे ज्या पक्षात आहेत, त्या पक्षात ते कधीच नसतात. अब्दुल सत्तार हे ज्या पक्षाच्या पदावर असतात ते कधीच त्यांचे नसतात हे त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले आहे असे दानवे यांनी म्हटले आहे. अब्दुल सत्तारांचे तोंडच असे आहे की ते बाजारात फिरतात अशी बोचरी टीका संतोष दानवे यांनी केली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!