रघुनाथ कुचिक यांचा जामीन रद्द करण्यासाठी पोलिसांनी प्रक्रिया सुरू – चित्रा वाघ

491 0

पुणे- शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर एका तरुणीने बलात्कार केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी पुण्यात राजकारण तापले होते. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशनला येऊन रघुनाथ कुचिक यांचे पद रद्द करावे व जामीन रद्द करावा अशी मागणी केली होती. त्यावर जामीन रद्द करण्याची प्रक्रिया शिवाजीनगर पोलिसांनी सुरू केली आहे, अशी माहिती चित्रा वाघ यांनी दिली आहे.

शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांनी बनावट पुरावे सादर केले त्यामुळे त्यांचा जामीन लवकरच रद्द करण्यासाठी पुण्यातील शिवाजीनगर पोलिसांनी प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे लवकरच रघुनाथ कुचिक गजाआड जातील. असा दावा भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पुण्यातील पत्रकार परिषद व्यक्त केला आहे.

या पत्रकार परिषदेला भाजपाचे संघटन सरचिटणीस राजेश पांडे भाजपचे पुणे शहर प्रवक्ता आणि उपाध्यक्ष माजी नगरसेवक धनंजय जाधव, प्रचार प्रसिद्धी सह प्रमुख पुष्कर तुळजापूरकर उपस्थित होते.

चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत मुंबईचे पोलीस आयुक्तांवर देखील ताशेरे ओढले आहेत. विनयभंग आणि बाललैंगिक अत्याचार खोट्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी मुंबईच्या पोलिस आयुक्तांनी एक बेकायदेशीर परिपत्रक काढल्याचा दावा देखील चित्रा वाघ यांनी केलाय. मुंबई पोलीस आयुक्तांकडे तसा कोणताही कायदेशीर अधिकार नसताना देखील मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी जे परिपत्रक काढले त्यामुळे विनयभंग आणि बाललैंगिक अत्याचार गुन्ह्यातील खऱ्या पीडितांना मोठा फटका बसेल. असा दावा देखील चित्रा वाघ यांनी केला आहे.

विधान परिषदेवर इतर कोणत्याही पक्षाने महिला उमेदवाराला संधी दिली नाही. त्यामुळे मला विधानपरिषद उमेदवारी मिळाली नाही याची मला खंत नाही. उलट माझ्या पक्षाने एका महिलेला उमेदवारी दिली, त्यामुळे विधानपरिषद आमची एक महिला आमदार वाढत असल्याचा मला आनंद आहे. असं चित्रा वाघ यांनी स्पष्ट केलं.

 

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!