पाकिस्तानमध्ये हिंदू मंदिराची तोडफोड झाल्याने भाविक भयभीत

341 0

कराची- पाकिस्तानमधील कराचीमध्ये एका हिंदू मंदिराची तोडफोड करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देवतांच्या मूर्तीं भंग करण्यात आल्या आहेत. त्यामुळे भाविक भयभीत झाले आहेत. ही घटना ही घटना कराची शहरातील कोरंगी भागात घडली आहे. 

, जेथे श्री मारी माता मंदिरातील देवतांच्या मूर्तींची तोडफोड करण्यात आली. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रकरणाचा तपास सुरू केला.

मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानातील अल्पसंख्याक हिंदू समुदायाच्या प्रार्थनास्थळांची तोडफोड करण्याचे हे ताजे प्रकरण आहे. कराची कोरंगी भागातील श्री मारी माता मंदिरात बुधवारी देवतांच्या मूर्तींची तोडफोड करण्यात आली. कोरंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मारी मातेचे मंदिर आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मंदिराची पाहणी करून या प्रकरणाची चौकशी केली.

‘द एक्स्प्रेस ट्रिब्यून’ या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, या घटनेमुळे कराचीतील हिंदू समुदायाचे लोक भयभीत झाले आहेत. ही घटना घडलेल्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या परिसरात राहणार्‍या हिंदू समाजातील लोकांनी सांगितले की, मोटारसायकलवरून आलेल्या सहा ते आठ जणांनी मंदिरावर हल्ला केला. हा हल्ला कोणी आणि का केला हे आम्हाला माहीत नाही, असे ते म्हणाले. पोलिसांना तक्रार नोंदवण्यास सांगितले आहे.

Share This News
error: Content is protected !!